केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. आज सकाळी आपल्याच निवासस्थानी मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांचा डावा पाय अचानक लचकला त्यांना तातडीने एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या पायाला तेथेच प्लॅस्टर घातल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
65 वर्षीय राजनाथ सिंह यांचा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी भाजपने निश्चीत केलेल्या पॅनेल मध्ये समावेश आहे. त्यामुळे ते सध्या त्यासाठी विविध नेत्यांच्या भेटीगाठीत व्यस्त असतानाच त्यांना ही मोठी दुखापत झाल्याने त्यांच्या या धावपळीवर मर्यादा आल्या आहेत.
COMMENTS