डॉ. नरेंद्र जाधव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार, आरएसएसची पसंती ?

डॉ. नरेंद्र जाधव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार, आरएसएसची पसंती ?

राष्ट्रपतीपदासाठी सध्या देशभर विविध नावांची चर्चा सुरू आहे. एनडीएकडूनही सुषमा स्वराज यांच्यासह अनेक नेत्यांची चर्चा आहे. तर विरोधी पक्षही राष्टपतीपादासाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रीय स्वसंयसेवक संघाकडून ऐनवेळी अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचं नाव राष्ट्रपतीपादसाठीचे उमेदावर म्हणून पुढं केलं जाऊ शकतं. बिझनेस वर्ल्ड या इंग्रजी वृत्तपत्रानं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. अर्थतज्ज्ञ असलेले जाधव हे मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक आहेत. तसंच ते दलित समाजाचे आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाकडूनही त्यांना विरोध होणार नाही अंशी अटकल आरएसएसकडून वर्तविली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जाधव यांचे भाजप आणि आरएसएसचे संबंध अधिक घनिष्ठ झाल्याचं दिसून येतंय. डॉ. जाधव यांनी आरएसएसच्य काही कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणूनही हजेरी लावली आहे. डॉ जाधव यांच्या डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनाला आरएसएसचे सरचिटणीस भय्याजी जोशी यांनी हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलित नेते म्हणून मर्यादीत ठेऊ नये असं म्हटलं होतं. डॉ. जाधव यांचे हे वक्तव्य आरएसएच्या विचारांशी हे मिळतं जुळतं आहे. डॉ. जाधव यांची मोदी सरकारने राज्यसभेवर वर्णी लावली आहे. जाधव यांना या विषयी बिझनेस वर्ल्ड ने विचारणा केली असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.  मोदी- शाह यांना आरएसएसची ही निवड पटते का ? हे पाहण्यासाठी येत्या 23 तारखेपर्यंत वाट पहावी लागेल. दरम्यान आरएसएसकडून विद्यमान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदासाठी शिफारस केल्याचं बोललं जातंय. दरम्यान राष्ट्रपतीपदाचा सर्वसमावेशक उमेदवार ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीनं या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

COMMENTS