गेल्या तीन वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही – अमित शहा

गेल्या तीन वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही – अमित शहा

भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांच्या कार्यकाळात सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत शहा बोलत होते. ते म्हणाले, भाजप सरकारने महिला, आदिवासी आणि गरिबांसाठी नवीन योजना आणल्या आहेत. देशाविषयी जनतेची मानसिकता सजग केली. जीएसटीला मूर्त स्वरुप देण्याचे काम या सरकारने केले. देशात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा आणि वेग दिला. या सरकारने जीएसटीला मूर्त स्वरुप देण्याचे काम केले. तसेच भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत येऊन ,तीन वर्षे झाली असून, या काळात सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असे शहा म्हणाले.
यावेळी अमित शहा यांना राज्यातील मध्यवर्ती निवडणुकांबाबत विचारले असता. भाजप सरकार मध्यवर्ती निवडणुकांसाठी सज्ज आहे. मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर भाजपच जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबद विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. तसेच राज्य सरकारच्या कामांचे अमित शहा यांनी कौतुक केले. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते.

अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे –

या सरकार ने शेतकऱ्यांसाठी खूप वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत – अमित शहा
आम्ही बोललो होतो आम्ही पारदर्शक सरकार देऊ आम्ही ती दिली आहे – अमित शहा
आमच्या विरोधात विरोधी सरकार सुद्धा बोलू शकत नाही हि आमची पारदर्शकता – अमित शहा
काँगेसच्या काळात पंतप्रधानांना कोण पंतप्रधान म्हणत नव्हते, प्रत्येक नेता स्वतःला पंतप्रधान समजत असे – अमित शहा
प्रत्येक गरिबाला बँकेशी जोडण्याचे काम मोदी सरकारने केले – अमित शहा
5 लाख सिलिंडर ग्रामीण भागात जनतेला दिले – अमित शहा
मुद्रा बँकेच्या माध्यमातून 7 कोटी  64 लाख तरुणांना व्यवसाय करण्याची संधी दिली – अमित शहा
देशात 8 करोड कुटुंबात शौचालय नव्हते. 4.5 कोटी कुटुंबाना शौचालय बांधून दिले -अमित शहा
सर्जिकल स्ट्राईकमुळे जगापुढे भारताचे एक उदाहरण ठेवले गेले -अमित शहा
ओबीसी समाजाला संविधानिक मान्यता दिली – अमित शहा
एका वेळी 140 सॅटेलाईट स्थिर करण्यात आले – अमित शहा
2020 पर्यंत सर्व गावात लाईट असेल – अमित शहा
13000गावांना लाईट देण्याचे काम मोदी सरकारने पूर्ण केले – अमित शहा

COMMENTS