गैरवर्तनप्रकरणी दत्ता साने यांचे नगरसेवक पद  रद्द करावे – महापौर काळजे

गैरवर्तनप्रकरणी दत्ता साने यांचे नगरसेवक पद रद्द करावे – महापौर काळजे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून  महापौर आणि आयुक्तांच्या अंगावर कुंडी फेकण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे नगरसेवक पद रद्द करावे, असा ठराव महापालिकेच्या सभेत करण्यात येईल, असा इशारा महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी (दि. 21) दिली. 

महापौर काळजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरसेवक दत्ता साने यांनी महापौर आणि आयुक्तांच्या आसनाशेजारी ठेवलेली कुंडी फेकण्याचा प्रयत्न केला. त्याबाबतचे व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याकडे आहेत. दत्ता साने यांचे हे वर्तन निंदनीय आहे. त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 13 अंतर्गत गैरवर्तन व अशोभनीय वर्तन केल्यास संबंधित नगरसेवकांचे पद रद्द होऊ शकतो. या कलमाअंतर्गत दत्ता साने यांचे नगरसेवक पद रद्द करावे, यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव करून तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविणार असल्याचे, महापौर काळजे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आपले नगरसेवक पद रद्द करून दाखवावेच असे खुले आवाहन, ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी दिले आहे.

COMMENTS