गैरहजेरीच्या वादानंतर सचिनची पावसाळी अधिवेशनात हजेरी, रेखाची मात्र अनुपस्थित

गैरहजेरीच्या वादानंतर सचिनची पावसाळी अधिवेशनात हजेरी, रेखाची मात्र अनुपस्थित

खासदार सचिन तेंडुलकरने आज (गुरुवारी) अचानक राज्यसभेत हजेरी लावली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना सचिनच्या उपस्थितीचा हा पहिला दिवस होता. यात खासदार सचिनने एकही प्रश्न मांडला नाही. सचिनसोबतच सभागृहात मेरीकॉम सुद्धा सहभागी झाली.

राज्यसभा खासदार सचिन आणि रेखा यांच्या अनुपस्थितीवरून नुकताच मोठा वाद झाला. समाजवादी पक्षाचे खासदार नरेश चंद्र अग्रवाल यांनी तर दोघांच्या राजीनाम्याच्या सुद्धा मागणी केली होती.

 

COMMENTS