पुण्यात मराठा मोर्चाची 6 ऑगस्टला दुचाकी रॅली

पुण्यात मराठा मोर्चाची 6 ऑगस्टला दुचाकी रॅली

मुंबईत 9 ऑगस्टला काढण्यात येणाऱया मराठा क्रांती मूक महामोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाज (पुणे जिल्हा) च्या वतीने 6 ऑगस्टला पुण्यात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये दिली.

रविवारी 6 ऑगस्ट रोजी  ही रॅली सकाळी 11 वाजता मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुरु करण्यात येणार आहे.  त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तिचा समोराप भिडे पुलाजवळील नदीपात्रात करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील ही रॅली पुणे शहराच्या आजवरच्या इतिहासातील सर्व उच्चांक मोडून काढेल असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.मराठा क्रांती मोर्चात जी शिस्त पहावयास मिळाली तीच शिस्त बाईक रॅलीमध्येही पाहण्यास मिळेल असेही आयोजकांकडून सांगण्यात आले.

 

COMMENTS