गोभक्तीच्या नावावर नागरिकांची हत्या कदापी मान्य नसल्याचे, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. देशात गायीच्या नावाखाली हिंसाचार केला जातो. गायीचे रक्षण करण्यासाठी लोक पुढे येतात आणि माणसांची हत्या करतात. हिंसाचार माजवतात, गोरक्षणाची ही कोणती पद्धत आहे? असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी नागरिकांना संबोधित करताना मोदी बोलत होते. त्यांनी गोभक्तीच्या नावाने नागरिकांची हत्या करणे हे महात्मा गांधीच्या अहिंसेच्या तत्वात बसत नसल्याचे स्पष्ट केले. यासह गोभक्तीच्या नावावर नागरिकांची हत्या खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Killing people in name of 'Gau Bhakti' not acceptable: PM #Modi
Read @ANI_news story | https://t.co/Odd2YNqisI pic.twitter.com/yocFkQNQAO
— ANI Digital (@ani_digital) June 29, 2017
COMMENTS