देशाच्या विविध भागात गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसाचारावरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले आहे. ‘महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश मध्ये नोडल आॅफीसर तैनात करावे. डीजीपी आणि मुख्य सचिवांनी काय काम केले याचा अहवाल कोर्टाला सादर करावा.’ असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.
गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारला कायदा हातात घेणाऱ्या गोरक्षकांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक जिल्ह्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची विभागीय अधिकारी म्हणून नेमणूक करा. राज्याच्या मुख्य सचिवांना एका आठवड्यात याबाबतचा अहवाल सादर करा, असे न्यायालयाने सांगितले आहे.
COMMENTS