सुरेश कलमाडी राजकारणात पुन्हा सक्रिय होणार ?

सुरेश कलमाडी राजकारणात पुन्हा सक्रिय होणार ?

पुणे : माजी खासदार सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर कॉंग्रेस पक्षातून निलंबित व्हावे लागले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. मात्र काल पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या श्रीकसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीत सुरेश कलमाडींचा सहभाग चर्चेचा विषय ठरला.

श्रीकसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीने या सोहळ्याची सुरुवात झाली. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि कॉंग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी गणपतीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या सर्व राजकारण्यांनी एकत्र बसून नाश्‍ताही केला. कलमाडी यांनी अनेक वर्षांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे कलमाडी पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

COMMENTS