नितेश राणेंविरोधात गोव्यात आरोपपत्र दाखल

नितेश राणेंविरोधात गोव्यात आरोपपत्र दाखल

गोवा – गोव्यात  3 डिसेंबर 2013 रोजी पेडणे तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग 17 वरील धारगळ येथे टोल नाक्यावर नितेश राणे यांनी आपल्या सहकार्यांसह तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी गोव्यातील पेडणे पोलिसांनी काल (गुरूवारी) प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र आरोपपत्र दाखल केले.

 

नितेश राणे आणि त्यांचे सहकारी दोन गाड्यांमधून पेडण्याहून गोव्यात म्हापशाच्या दिशेने जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर धारगळ येथे टोल नाका आहे. राज्याबाहेरील वाहनांवर तेथे शुल्क आकारला जातो. नीतेश राणे यांच्याकडे या नाक्यावर शुल्काची मागणी करताच राणे यांच्या गाडीतील सहकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती. यानंतर मागील गाडीतील अन्य चार जणांनी मिळून टोल नाक्‍यावरील अन्‍य दोन कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली होती. तसेच तेथील सामानाचीही नासधुस केली होती. या हल्ल्यात नाक्यावरील कर्मचारी जखमी झाले होते. घटनेनंतर पेडणे पोलिसांनी पाठलाग करून कळंगुट येथून नितेश राणे आणि त्यांच्या 8 सहकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. संतोष सोमा राऊत, सागर गोपाळ पाटील, विनम्र अनिल आचरेकर, प्रशांत नामदेव माळकर, प्रशांत ज्ञानदेव माळकर, राकेश प्रल्हाद परब, रिचेंद्र लवू सावंत, मुकुंद बाळकृष्ण परब, राहुल शिवाजी परब, आदींचा यात समावेश होता.
3 डिसेंबर 2013 रोजी सायंकाळी प्राथमिक चौकशीनंतर नितेश राणेंसह इतरांना त्‍यावेळी अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी रात्री नितेश राणेंसह अन्य चौघांना जामीन मंजूर झाला होता. या घटनेच्या तब्बल तीन वर्षांनंतर पेडणे पोलिसांनी गुरूवारी हे आरोपपत्र सादर केले आहे.

 

 

COMMENTS