पुण्याचा कचरा प्रश्न लवकरच निकाली निघेल – आ. विजय शिवतारे

पुण्याचा कचरा प्रश्न लवकरच निकाली निघेल – आ. विजय शिवतारे

आ. विजय शिवतारे आज घेणार आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट

पुण्यातील कचरा कोंडीचा आज 22 वा दिवस आहे. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्यात महापालिकेतील पुढार्यांना अजून तरी यश आलेलं नाही. ग्रामस्थ प्रशासनाला देखील दाद द्यायला तयार नाहीत. दुसरीकडे कचरा गाड्यांना कचरा डेपोत प्रवेशबंदी असल्याने शहरातील कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचं साम्राज्य पसरलय. कचरा प्रश्न पेटला असताना पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट तसेच महापौर मुक्ता टिळक विदेश दौर्यावर आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत पुण्यातील कचरा प्रश्न सोडवण्याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची माहिती आहे. हा प्रश्न अधिक चिघळू न देता सध्या सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे आता यापुढे काय हालचाली होतात आणि कचरा कोंडी फुटते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे आज आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. कचरा डेपोचा प्रश्न आपल्या मतदारसंघातील असल्याने त्यावर सामंजस्याने तोडगा काढणार असल्याचं त्यांनी म्हटलय. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलय. पालकमंत्री गिरिश बापट विदेशी असताना त्यांचे राजकिय विरोधक असलेल्या शिवतारेंनी कचरा प्रश्नात एन्ट्री घेतलीय. हा प्रश्न आजच निकाली निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे शिवतारे यांनी यापूर्वी ग्रामस्थांच्या बाजूने आंदोलन केलं होतं. आज तेच ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करणार आहेत.

 

 

COMMENTS