बंगळुरू – ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा प्रकरणी कर्नाटक सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी या प्रकरणी आज तातडीची बैठक बोलावली होती. कर्नाटक राज्य सरकारकडून हत्येची गंभीर दखल घेण्यात आली आहे. हत्येच्या तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हत्या करण्यात आली. लंकेश यांच्या बंगळुरूमधील राजेश्वरी गार्डन या भागातील राहत्या घरी त्यांची हत्या करण्यात आली. रात्री आठच्या सुमारास तीन जण त्यांच्या घरी आले. आणि गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
COMMENTS