सर्वसामन्यांचे प्रवासी वाहन असलेल्या एसटीमध्ये आता परिवर्तन होणार आहे. एसटीच्या परिवर्तन श्रेणीतील स्टील बांधणीच्या दणगट बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. या नवीन आणि दणगड बसेसची बांधणी दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत करण्यात आली असून, लवकरच नव्या रंगात ही दणगट बस रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत.
यााधी एसटीच्या बसेसची बांधणी ही अॅल्यूमिनिअम या धातूपासून होत होती. त्यामुळे अपघात झाल्यास बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत, तसंच प्रवाशांनाही दुखापती होत.एसटी अधिक सुरक्षित व्हावी, एसटीमध्ये अधिक सुविधा प्रवाशांना मिळाव्यात यासाठी ” परिवर्तन ” एसटीची बांधणी आता स्टीलमध्ये केली जाणार आहे. तसंच प्रायोगिक तत्वावर परिवर्तन एसटीला नवा रंगही दिला गेला असून प्रवाशांच्या सोईसाठी अंतर्गत काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अपघातातही खंबीरपणे प्रवाशांची काळजी घेणाऱ्या स्टीलच्या बसेसची निर्मिती करण्यात येत आहे.
कशी असेल नवीन एसटी?
परिवर्तन एसटीचा रंग बदलण्यात आला असून आकर्षक रंगसंगती ठेवण्यात आली आहे. परिवर्तन एसटीची बांधणी मजबूत आणि हलक्या वजनाच्या स्टीलमध्ये करण्यात आली असून बसची उंची 30 सेमीने वाढवण्यात आली आहे, यामुळे (लगेज स्पेस) सामान ठेवण्यासाठी तिप्पट जागा मिळणार आहे.
बसच्या खिडक्यांचा आकार वाढवण्यात आला आहे. बस बांधणी करतांना सांध्यामध्ये थर्माकोलचा वापर केला गेला असल्याने गाडीचा आवाज कमी येणार. गाडीचे मार्ग फलक एलईडीमध्ये आहेत. प्रवाशांना सूचना देण्यासाठी चालकाजवळ स्पीकरची सोय उपलब्ध करण्यात आलीयं. गाडीमध्ये हवा खेळती रहावी यासाठी गाडीच्या छताला तीन रुफ हॅच असणार आहे. बससाठी स्पेअरव्हील सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी बसवण्यात आले आहे.आणीबाणी वेळी प्रवाशांना सतर्क करण्यासाठी अलार्मची सोय.धावत्या बसला हवेचा विरोध कमी होण्यासाठी बसची रचना ऐरोडायनामीक बनवण्यावर भर दिला गेला आहे.
या नव्या बसची बांधणी दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत करण्यात आली असून काही दिवस रस्त्यावर धावणार आहे.
COMMENTS