मुंबई – घाटकोपर येथील दामोदर पार्कजवळील सिद्धी साई इमारत दुर्घटनेच्या आरोपाखाली शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितपला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर विक्रोळी पार्कसाईट पोलिस चौकीमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेसाठी शितप जबाबदार असून यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी इमारत दुर्घटनेतील बचावलेल्या कुटुंबीयांनी केली होती.
घाटकोपर येथील दामोदर पार्कजवळील सिद्धी साई इमारत दुर्घटनेच्या आरोपाखाली शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितपला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर विक्रोळी पार्कसाईट पोलिस चौकीमध्ये भारतीय दंडविधान कलम (आयपीसी) ३०४ (२), ३३६, ३३८, २८३/७ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धी साई सोसायटीची इमारत साधारण 40 वर्षे जुनी आहे. 4 मजली इमारतीत एकूण 12 फ्लॅटमध्ये 30 ते 32 लोक राहत होते. इमारतीच्या तळ मजल्यावर शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितप यांच्या मालकीचे शितप रुग्णालय होते. विद्या खाडे या डॉक्टरला त्यांनी ते भाड्याने दिलेले होते. गेल्या दोन महिन्यांपासून हे रुग्णालय बंद करून त्याचे गेस्ट हाऊस बनविण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू होते.पालिका अधिकार्यांना आपल्या कह्यात घेऊन शितप यांनी या जागेत एक ना अनेक बदल केले. रहिवाशांचा विरोध दादागिरीने मोडून काढीत त्यांनी काही पिलरदेखील तोडले. त्यामुळे इमारत कमजोर झाली, खचली आणि मंगळवारी कोसळली. यादुर्घटनेनंतर जमीनदोस्त झालेल्या साईदर्शनकडे शितप फिरकला देखील नाही.
पोलिसांनी या प्रकरणी सुनील शितपला अटक केली असून, पुढील तपास चालू असून शितपला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
COMMENTS