मुख्यमंत्री भडकले, सचिव आणि अधिका-यांना झापलं !

मुख्यमंत्री भडकले, सचिव आणि अधिका-यांना झापलं !

मुंबई – नेहमी अत्यंत शांतपणे बोलणारे आणि सर्वच बाबतीत संयमाने वागणारे मुख्यमंत्री आज विधीमंडळात चांगलेच संतापले. विधीमंडळाचं कामकाज सुरू असताना अनेक वेळा सचिव आणि इतर अधिकारी गैरहजर असतात. महत्वाच्या विषयावर चर्चा असतानाही अधिका-यांना त्याची काहीच कल्पना नसते. खरंतर विविध विषयावर चर्चा सुरू असताना त्या त्या सचिवांनी आणि अधिका-यांनी सभागृरहात हजर राहणं गरजेचं असतं. मात्र ते पाळलं जात नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्री चांगलेच भडकले. सचिवांनी कामकाज सुरू असताना सभागृहात हजर रहावे, अधिका-यांनाही मी याच सूचना देत आहे. याची मी गंभीरपणे दखल घेतली आहे. अशा शब्दात त्यांनी सचिव आणि अधिका-यांना सुनावलं.

COMMENTS