“चंद्रकांतदादा पाटील व्हावेत मुख्यमंत्री”

“चंद्रकांतदादा पाटील व्हावेत मुख्यमंत्री”

कोल्हापुर –  राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज भुदरगड तालु्क्याचा दौरा केला. गारगोटीतील प्रमुख मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. ‘दादा’ राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे गणेश मंडळांनी बाप्पासमोर घातले.

पालकमंत्री पाटील यांच्या दौऱ्याला खानापुरातून सुरूवात झाली. प्रथम आपल्या घरी जाऊन त्यांनी ‘श्रीं’ चे दर्शन घेतले. त्यानंतर भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी देवराज बारदेस्कर, जयवंत चोरगे, प्राचार्य धनाजी मोरस्कर, वाळव्याचे भरत पाटील यांची उपस्थिती होती. गारगोटीमध्ये आमदार बजरंग देसाई विचार मंचच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पाटील यांनी उपस्थितांसोबत चर्चा केली.

COMMENTS