मुंबई भेंडीबाजार इमारत दुर्घटनेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप

मुंबई भेंडीबाजार इमारत दुर्घटनेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप

मुंबई – जे.जे. मार्ग परिसरात पाकमोडिया स्ट्रीटवर असलेली हुसैनीवाला इमारत कोसळली आहे. ही पाच मजली इमारत जवळपास 125 वर्षे जुनी होती. या इमारतीमध्ये 9 कुटुंबे राहत होती. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत मृतांचा आकडा 16  वर पोहोचला असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.  ढिगाऱ्यातून अनेकांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली 60 ते 65 रहिवासी अडकल्याची भीती आहे. सध्या घटनास्थळी 10 अग्निशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफच्या टीमही दाखल झाल्या आहेत. या इमारतीच्या जवळपास असलेल्या इमारती मोकळ्या करण्यात आल्या आहे. यावर आता राजकीय खलबते सुरू झाली आहेत.  
या इमारत दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत आपण स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असे  म्हटले आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.  मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत व पुनर्वसनाची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘सरकारला लोकांच्या जीविताबाबत संवेदना राहिली नाही. किडे मुंग्याप्रमाणे माणसं मरतायेत तरी सरकार गंभीर नाही. शासनाने तात्काळ धोकादायक इमारती खाली कराव्यात. धोकादायक इमारतींच्या पुर्नबांधणीचा कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा. धोकादायक इमारतींबाबत तीन वर्षात सरकारने काही केले नाही.’ अशी टीका  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण केली.
‘बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्गापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे सरकारने त्याकडे लक्ष द्यावे   सरकार आणि महापालिकेचे डिजास्टर मॅनेजमेंट कुठे आहे? फक्त कागदावरच आहे प्रत्यक्षात काहीच नाही. वारंवार घडणा-या घटना़ंमधून सरकार काहीच बोध घेत नाही.’ असे अशोक चव्हाण म्हणाले.

COMMENTS