मुंबईतील चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवून देण्याचा एक निनावी फोन आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आज सकाळी 11.10 वाजण्याच्या सुमारास चर्चगेट स्थानक बॉम्बनं उडवून देऊ, अशी धमकी देणारा निनावी फोन आला होता.
आरपीएफ हेल्पलाईनला अज्ञातानं फोन करुन ही धमकी दिली आहे. हा फोन आल्यानंतर रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. धमकीचा फोन आल्यानंतर एटीएस, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलासहीत शहर पोलीस चर्चगेट रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. चर्चगेट स्थानकातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. चर्चगेट स्थानकाची कसून तपासणी केली जात आहे. आरपीएफ, लोहमार्ग पोलीसांची संख्याही वाढवण्यात आली आहे. आरपीएफच्या हेल्पलाईनवर कुठून फोन आला होता याचादेखील तपास सुरु आहे.
COMMENTS