चहावाल्याने मुलींसाठी दिला तब्ब्ल दीडकोटी हुंडा, चहावाला आयकर आणि पोलिसांच्या रडारवर

चहावाल्याने मुलींसाठी दिला तब्ब्ल दीडकोटी हुंडा, चहावाला आयकर आणि पोलिसांच्या रडारवर

राजस्थानमधील एका चहावाल्याने आपल्या सहा मुलींच्या लग्नात तब्बल 1 कोटी 51 लाख रूपयांचा हुंडा दिल्याचे समोर आले आहे. यामुळे चहावाला लिलाराम गुर्जर प्राप्तिकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. याच्या मुलींचे लग्न 4 एप्रिल रोजी झाले होते. एका व्हिडिओत तो स्थानिक लोक आणि समाजातील नेत्यांसमोर पैसे मोजताना दिसत आहे.

 

कोटपुतलीच्या जवळ हडोता येथे तो एक चहाचे दुकान चालवतो. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला नोटीस पाठवून उत्पन्नाच्या स्त्रोताची माहिती मागण्यात आली आहे. परंतु, त्याने कोणतेच उत्तर दिले नाही. गुरूवारपर्यंत त्याच्या उत्तराची वाट पाहिली जाईल. यानंतर त्याची चौकशी केली जाणार असून विवरण पत्र भरले की नाही हेही तपासण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

COMMENTS