चैत्री एकादशीला विठ्ठलाला पुरणाचा नेवैद्य

चैत्री एकादशीला विठ्ठलाला पुरणाचा नेवैद्य

अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा

पंढरपूर वारकरी सांप्रदायामध्ये अनेक रूढी,परंपरा आजही जोपासला जात आहे. कंठी मिरवा कृष्ण तुळस,व्रत करा एकादशी. हे व्रत वारकरी सांप्रदायात पाळले जाते. एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. मात्र सावळ्या विठुरायाला चैत्री एकादशीला पुरण-पोळीचा नेवैद्य दाखविला जातो. 

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. वारकरी संप्रदाय आणि परंपरा आजही जोपासली जाते. गळ्यात तुळशीची माळ आणि एकादशी करणारे ते विठ्ठल भक्त. प्रयेक महिन्यातील शुद्ध आणि कृष्ण असे २ एकादशी असतात. साधारण १५ दिवसा नंतर एकादशी येते. अशा वर्षातील २४ एकादशीचे व्रत  आणि उपासना वारकरी सांप्रयदाय करीत असतो. मात्र चैत्री एकादशी याला अपवाद आहे. या चैत्री एकादशीला देवाला म्हणजेच विठ्ठलाला दुपारचा नेवैद्य पुरण-पोळी दाखविला जातो.

वारकरी सांप्रदायात या विषयी एक रंजक कथा सांगतात. कर्नाटकातील विजयनगर येथील कृष्णदेवराय या राजाचे पंढरपूर येथील श्री विठ्ठलावर निस्सीम भक्ती होती. या भक्तीपोटी या राजाने येथील श्री विठ्ठलाची मूर्ती विजयनगर येथे नेण्यात आली. त्यानंतर श्री एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांनी राजाकडून आपली विठ्ठलाची मूर्ती घेऊन येतो असा निश्चय केला. आणि राजा कृष्णदेवराय यांच्याशी वाद विवाद करून राजाचे मन जिकून श्री विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणली. आणि चैत्र एकादशीला त्याची पुन्हा स्थापना  केली. म्हणून या दिवशी देवाला पुरणाचा नेवैद्य दाखविला जातो. वारकरी सांप्रदायात एकादशीचे व्रत पाळले जाते. मात्र चैत्री एकादशीला देवला जेवण आणि वारकर्यानी उपवास केला जातो, असे वारकरी पाईक संघटनेचे प्रवक्ते हा.भ.प. वीर महाराज यांनी सांगितले. या एकादशीच्या अनेक कथा आहेत. असे जरी असले तरी एकादशीला देवाला पुरणाचा नेवैद्य दाखविला जातो. आणि आजही ती परंपरा जोपासली जाते हे हि एक वैशिट्य म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

 

देवाला पुरण तर मातेला भगर

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या भोजन  गृहात एकादशीची तयारी पूर्ण झाली आहे. समितीच्या या विभागातील सुनंदा कुलकर्णी यांनी सांगितले कि, पहाटे काकडा झाल्यावर देवाला  न्याहारी म्हणून भगर दिली जाते. दुपारी नेवैद्य म्हणून पुरणाची पोळी,साखरभात,शेवयाची खीर,बेसन लाडू,कढी,चटणी,कोशिंबीर,उडदाचे पापड,आळु वडी,भजी, कुरडई,सुक्की भाजी आदी पदार्थानाचा नेवैद्य दाखविला जातो.संध्याकाळी देवला भगर नेवैद्य म्हणून दाखविला जातो. त्याच वेळी रुक्मिणी मातेला दुपारचा नेवैद्य आणि संध्याकाळचा म्हणून साबुदाण्याची खिचडी दाखविली जाते. गेली अनेक वर्षांपासून हि परंपरा सुरु आहे.

COMMENTS