मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या विविध आर्थिक घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. भुजबळ यांना तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आर्थर रोड तरुगांच्या अतिरिक्त अधिक्षकांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे. भुजबळ यांना खायला चमचमीत पदार्थ पुरवले जातात. त्यांना चिकन आणि मटण पुरवले जाते त्याच सोबत दारुही दिली जाते असा आरोप दमानिया यांनी पत्रात केलेला आहे. त्याचसोबत भुजबळांना करमणुकीसाठी मोठा टीव्ही संचही दिल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय. त्यांना वेळोवेळी फळेही उपलब्ध करुन दिली जातात असंही दमानिया यांचा आरोप आहे.
COMMENTS