बाबा रामदेव यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

बाबा रामदेव यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई – योगगुरू बाबा रामदेव यांनी आज मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येतंय. काही कौटुंबिक विषयावर बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जातंय. सुमारे पाऊन तास त्यांच्यात चर्चा झाली. बाबा रामदेव यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याच्या आधी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आज सकाळी भेट घेतली.

COMMENTS