वडिलांच्या किंवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींपैकी असलेले जात वैधता प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार असून, यासाठी कोणत्याही स्वतंत्र पुराव्याची गरज नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
यापूर्वी वडिलांचे जात वैधता प्रमाणपत्र असतानाही संबंधितांच्या पाल्यांना वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करतेवेळी पुन्हा सर्व पुरावे समितीसमोर सादर करणे बंधनकारक होते. त्यामुळे राज्यातील अनेकांना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत असे. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जात वैधता प्रमाणपत्रासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार वडिलांच्या रक्तनाते असलेल्या संबंधित व्यक्तींचे जात प्रमाणपत्र सादर करणा-या अर्जदाराला समितीमार्फत थेट वैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे वैधता प्रमाणपत्र एका महिन्याच्या आतमध्ये मिळणार आहे.
COMMENTS