जिल्हा बँकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

जिल्हा बँकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

दिल्ली – केंद्र सरकारनं अडचणीतल्या जिल्हा बँकांना एका निर्णयाच्या माध्यमातून मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा बँकात असलेल्या जुन्या नोटा आरबीआयकडे जमा करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पुढच्या 30 दिवसात या सर्व जुन्या नोटा आरबीआयकडे जमा करता येणार आहे. या निर्णायामुळे जिल्हा बँकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकात मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. त्या घेण्यास आरबीआयने नकार दिला होता. त्यामध्ये मोठा काळा पैसा असल्याचा त्यांना संशय होता. मात्र त्यामुळे जिल्हा बँका आर्थिक अडचणीत आल्या होत्या. केंद्राच्या या निर्णयाचा राज्यात 32 जिल्हा बँकांना होणार आहे. त्यांच्याकडे एकूण 5228 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. सगळ्यात जास्त पैसे हे पुणे जिल्हा बँकेचे 811 कोटी रुपये आहेत. सातारा जिल्हा बँकेचे 399 कोटी, नाशिक जिल्हा बँकेचे 376 कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्हा बँकांचे 356 कोटी रुपये जुन्या नोटांच्या स्वरुपात आहेत.

COMMENTS