आज मध्यरात्रीपासून जीएसटी लागू होणार आहे. याबाबतची घोषणा आज मध्यरात्री 12 वाजता करण्यात येणार आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी संसदेला आज नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे.
अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जीएसटी ( गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ) च्या स्वागताचा कार्यक्रम पार पडणार आहे. यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बीग बी अमिताभ बच्चन, गायिका लता मंगेशकर आदींसह उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांची यावेळी उपस्थिती असणार आहे.
काँग्रेसचा कार्यक्रमावर बहिष्कार
मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांना जीएसटीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जीएसटी लागू केल्यामुळे सरकारचे समर्थन केले आहे.
COMMENTS