जीएसटीमुळे आज मध्यरात्री हॉटेल बंद !

जीएसटीमुळे आज मध्यरात्री हॉटेल बंद !

हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा प्लॅन आखत असाल तर तुम्हाला मध्यरात्रीच्या आधीच आटोपता घ्यावा लागणार आहे. कारण  1 जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने आज (30 जून) रात्री साडे अकरापासून रात्रभर मुंबईतील हॉटेल बंद राहणार आहेत.

एरव्ही बरेचसे रेस्टॉरंट रात्री 1.30 वाजता बंद होतात. पण शुक्रवार, जरी तो धंद्याचा दिवस असला तरी रेस्टॉरंट रात्री 11.30 वाजता बंद होणार आहे.  शनिवारी सकाळी सर्व रेस्टॉरंटमध्ये जीएसटीनुसार दर आकारले जाणार आहेत. काही तांत्रिक अडचणी आहेत. जीएसटी सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी सिस्टम रिबूट केल्या जाणार आहेत. हे सॉफ्टवेअर योग्य प्रकारे लागू व्हावे, यासाठी आज (शुक्रवारी) 12 वाजण्याआधी हॉटेल बंद करावे लागेल, असे मुंबईतील एका रेस्टॉरंट मॅनेजरने सांगितले.

जर एखाद्या ग्राहकाने रात्री 12 पूर्वी ऑर्डर केली, तर त्याचे बिल सध्याच्या दराप्रमाणेच आकारले जाईल. पण त्याच ग्राहकांनी 12 नंतर ऑर्डर दिली तर तो जीएसटीच्या कक्षेत येईल. त्यामुळे अशा अडचणीपासून वाचण्यासाठी रेस्टॉरंट मालकांनी रात्री 11.30 वाजता हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर हॉटेलमधील खाणे महाग होणार आहे. 30 जूनला मध्यरात्री राजधानी दिल्लीत जीएसटीचे अधिकृतरित्या लॉन्चिंग होणार आहे. यानंतर 1 जुलै रोजी एका विशेष कार्यक्रमात जीएसटी लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

 

COMMENTS