जीएसटीमुळे घरगुती गॅस सिलिंडर महागला

जीएसटीमुळे घरगुती गॅस सिलिंडर महागला

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांवर दिसायला लागला आहे. जीएसटी लागू होताच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. आता एलपीजी सिलेंडरसाठी 32 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

जूनपासून अनुदानाच्या किंमतीत सरकारने कपात केली आहे, त्यात जीएसटीमुळे भर पडणार आहे. ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव विपुल पुरोहित यांनी सांगितले, ‘समजा आग्र्यातील गॅस ग्राहकांना जूनपूर्वी ११९.८५ रुपये अनुदान मिळत होते. त्यात कपात केल्यामुळे आता 107 रुपयेच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार.’  परिणामी जीएसटी आणि अनुदान कपातीच्या संयुक्त प्रभावने प्रत्येक सिलींडरमागे 32 रुपयांची वाढ होईल.

दरम्यान, हॉटेलचे बील महागल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. एलपीजीवर 5 टक्के कर आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत दिल्लीसारख्या काही महानगरांमध्ये एलपीजीवर कर नव्हता, केवळ 2 आणि 4 टक्के व्हॅट लावला जाई. परिणामी ज्या राज्यांत एलपीजीवर कर नव्हता तेथे जीएसटीमुळे एलपीजी सिलींडरचा दर 12 ते 15 रुपयांनी वाढणार आहे.

COMMENTS