जीएसटीमुळे देशाच्या विकासात आमुलाग्र परिवर्तन होणार – मुख्यमंत्री

जीएसटीमुळे देशाच्या विकासात आमुलाग्र परिवर्तन होणार – मुख्यमंत्री

देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणे ही ऐतिहासिक घटना असून यामुळे एक देश, एक कर, एक बाजारपेठ ही रचना अस्तित्वात येणार आहे. या निर्णयामुळे देशाच्या विकासात आमूलाग्र परिवर्तन होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

याविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे व्यापारात अधिक सुलभता येईल. यामुळे महाराष्ट्राचा तर लाभ होणारच आहे, पण इतर अनेक राज्यांचाही यामुळे लक्षणीय विकास होणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. निरनिराळ्या प्रकारच्या करांमुळे यापूर्वी व्यापार क्षेत्राची अडचण होत होती. मात्र जीएसटीमुळे सर्व कर संपुष्टात येऊन देशात एकच करप्रणाली लागू होईल. व्यापार क्षेत्रासह देशाच्या विकासाला यामुळे मोठी गती मिळेल’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘हा कर लागू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सर्व पक्ष आणि विचारप्रवाहांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून यशस्वी अंमलबजावणीचा मार्ग सुकर केला. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो व विशेष आभार मानतो. महाराष्ट्र सरकार अतिशय भक्कमपणे या प्रक्रियेच्या अंमलबजावणीत अग्रेसर राहील’, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

COMMENTS