जीएसटीसाठी अधिवेशन बोलवता, मग शेतक-यांसाठी का नाही ? विरोधकांचा सवाल

जीएसटीसाठी अधिवेशन बोलवता, मग शेतक-यांसाठी का नाही ? विरोधकांचा सवाल

मुंबई – जीएसटीसाठी अधिवेशन बोलवता मग शेतक-यांसाठी का नाही असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला केला आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केली. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावून सरकारने कर्जमाफीचा फक्त एक ओळीचा ठराव करावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.  शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्री  भेट म्हणजे तर नाटक आहे. शेतक-यांचा कळवळा असेल तर सत्तेत राहता कशाला ? असा सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी केला.  वारंवार भूमिका बदलणा-या शिवसेनेनेची अवस्था सरड्या सारखी झाली आहे. अधिवेशनात , मंत्रीमंडळ गप्प बसायचं अन भेटीच नाटक करायचं हे कशासाठी ? असंही मुंडे म्हणाले.

 

COMMENTS