‘जीएसटी’ संदर्भात भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या मान्य !

‘जीएसटी’ संदर्भात भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या मान्य !

जीएसटी विधेयकावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ‘मातोश्री’ (दि. 8) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी जीएसटी विधेयका संदर्भात प्रेझेन्टेंसनही केलं. पण शिवसेनेनं महापालिकांची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी, जीएसटी नुकसान भरपाई विधेयक आणावं, अशी मागणी शिवसेनेनं होती. या सर्व मागण्या अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या आहे.

शिवसेनेच्या मागणीनुसार राज्याच्या जीएसटी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यामार्फत सुधारित मसुदा रात्री मातोश्रावर पाठवला.

मुंबई महापालिकेला केंद्र सरकारकडून मिळणारा जीएसटीचा निधी कमी असेल तर राज्य सरकार भरपाई देणार. राज्याकडून दिल्या जाणा-या निधीत दरवर्षी आठ टक्के वाढ करणार . या बाबी शिवसेनेच्या मागणीनुसार विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहे .  मुंबईला जकाती पासून मिळणारे उत्पन्न कमी पडू नये म्हणून शिवसेनेने ही भूमिका घेतली होती.

लोकसभा आणि राज्यसभेत भाजपने जीएसटी विधेयक मंजूर करून घेतलं. आणि येणाऱ्या 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी देखील देशभरात सुरू होणार आहे.

 

COMMENTS