मुंबई – मुंबईतून गोव्यात जाण्यासाठी सुरू करण्यात आलेली तेजस एक्सप्रेस ही सर्वसामान्यांसाठी असल्याचं सांगत, जीवाचं गोवा करण्यासाठी आहे असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलंय. तेजस एक्सप्रेसचं आज प्रभू यांच्या हस्ते उद्धाघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते.
रेल्वेतील खानपानसाठी नवीन योजना जाहीर केली आहे अशी माहितीही प्रभू यांनी दिली. कॅटरिंगचे स्टॉल स्थानिकांना देणार असल्याची माहितीही प्रभू यांनी दिली. प्रवाशांना खाण्यासाठी स्थानिक पदार्थ मिळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आयआरसीटीसीच्या वेबसाईटचं लवकर नूतनीकरण केलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच लवकरच मुंबई- अहमदाबाद अशी तेजस एक्सप्रेस सुरू करणार असल्याची माहितीही सुरेश प्रभू यांनी यावेळी दिली.
COMMENTS