दिल्ली – नोटबंदीच्या मुद्यावरुन आज सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलेच खडसावले. एखाद्याने प्रामाणिकपणे पैसे कमावले असतील आणि त्याला तुम्ही दिलेल्या मुदतीत जुन्या नोटा जमा करता आल्या नसतील त्यांच्या घामाचे पैसे हिरावण्याचा तुम्हाला हक्क नाही अशा शब्दात आज सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला खडसावले. अशा प्रामाणिक लोकांना नोटा बदलण्यासाठी आणखी एक संधी द्या असंही कोर्टानं सांगितलं आहे. याबाबत दोन आठवड्यात तुमचं म्हणणं मांडा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि आरबीआयला दिले आहेत. त्यामुळे जुन्या नोटा असणा-या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला सरकारने जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. जुन्या नोटा जमा करण्याची 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती.
COMMENTS