सांगली – सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारु दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे दारू आणि बियरचा टॅक्स कमी झाला म्हणून ह्या सरकारने पेट्रोल वर टॅक्स वाढवलाय आहे. पिणाऱ्याकडून घ्यायचा टॅक्स न पिणाऱ्यांकडून घेताना लाज वाटत नाही का, अशा शब्दात पेट्रोल दरवाढीवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
विरोधकांची संघर्ष यात्रा आज सांगलीत दाखल झाली. इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
COMMENTS