ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन

अभिनेते विनोद खन्ना यांचे मुंबईत आज (गुरुवारी) सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं  आज अखेर 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

घरी उपचार चालू असताना प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेले काही दिवस ते कॅन्सरवरही उपचार घेत होते.

विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर विनोद यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले. 1968 मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेता आणि खलनायकी भूमिका करत त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली.
1971 मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचा ‘हिरो’चा प्रवास सुरुच झाला. 2015मध्ये आलेला ‘दिलवाले’ हा त्यांनी काम केलेला अखेरचा सिनेमा. 1997मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय झाले. भाजपाचे गुरुजासपुर, पंजाबचे खासदार म्हणूनही ते निवडून आले होते.

 

विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथोनी’ यांसारख्या शानदार सिनेमात काम केलं होतं. विनोद खन्ना यांनी करिअरची सुरुवात निगेटिव्ह भूमिकेने केली होती. नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी 1971 च्या ‘हम तुम और वो’ मध्ये प्रमुख भूमिका साकारली.

COMMENTS