नांदेड-हैदराबाद विमानसेवेचा मोदींच्या हस्ते प्रारंभ

नांदेड-हैदराबाद विमानसेवेचा मोदींच्या हस्ते प्रारंभ

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या ‘उडान-उडे देश का आम नागरिक’ या महत्त्वाकांक्षी योजनेतील नांदेड -हैदराबाद विमान सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रारंभ होणार आहे. व्हिडिओ लिंकींगद्वारे मोदी या विमानसेवेचे उद्घाटन करणार आहेत.

यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोविंदसिंगजी विमानतळावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे तसेच कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, पालकमंत्री अर्जुन खोतकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच या विमान सेवेसह, शिमला ते दिल्ली तसेच शिमला ते कडपा या विमानसेवेचाही मोदींच्या हस्ते प्रारंभ करण्यात येणार आहे.

COMMENTS