मुंबई – राज्यातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनमत म्हैसकर असं त्याचं नाव आहे. सकाळी मित्राच्या घरी जातो असं सांगून गेलेल्या मनमत याने सकाळी साडेसातच्या दरम्यान दरिया महल, नेपेन्सी रोड, मलबार हिल येथील बिल्डिंगवरुन उडी मारून आत्महत्या केली.
पीएसआय चौधरी आणि एपीआय उंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली तेंव्हा त्याचे डोके फुटलेले आढळून आले. त्याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेल्याचे मलबार हिल पोलीसांनी सांगितले आहे. मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष तर मनिषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.
COMMENTS