ठाणे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत ५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण याबाबतची अधिसूचना काल जाहीर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्राप्त झाला असून त्याला अनुसरून शासन राजपत्रात हि अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. अधिसूचना प्रसिध्द होणे म्हणजे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याअगोदरची पहिली पायरी आहे.
हे राजपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.thane.nic.in या संकेत स्थळावर तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसील व गट विकास अधिकारी कार्यालये यांच्या सुचना फलकांवर लावण्यात आलेले आहे.
एकूण ५३ जागा निवडून द्यावयाच्या असून ३ जागा अनुसूचित जाती, १३ जागा अनुसूचित जमाती आणि १४ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. या सर्व प्रवर्गातील २७ जागा महिलांसाठी तर यातील ११ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत.
COMMENTS