पंतप्रधान मोदी आजपासून गुजरात दौर्‍यावर

पंतप्रधान मोदी आजपासून गुजरात दौर्‍यावर

आजापासून पंतप्रधान  मोदी दोन दिवसाच्या गुजरातच्या दौर्‍यावर आहेत.  आज सकाळी द्वारकाधीश मंदिरामध्ये दर्शन घेऊन ते गुजरात दौरा करणार आहेत. 2014च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर ते आज प्रथमच आपल्या वडनगरच्या जन्‍मभूमीत जाणार आहेत.

गुजरात दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध कार्यक्रमांचे व योजनांचे उद्‌घाटन करणार आहेत. गांधीनगरमधील आयआयटीच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन ते 8 रोजी करणार आहेत. अहमदाबाद-राजकोटला जाणार्‍या सहा पदरी राज्य महामार्ग, राजकोटमधील ग्रीनफिल्‍ड विमानतळाची पायाभरणी करण्यात येणार आहे. यावेळी द्वारकामध्ये नरेंद्र मोदी यांची सभाही होणार आहे. सुरेंद्रनगरमधील जोरावनगर येथील अत्‍याधुनिक दुध केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानालाही प्रारंभ करण्यात येणार आहे.

 

COMMENTS