ठाणे – ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच उद्या गणरायाचे आगमन होणार आहे. तरीही महापालिकेने खड्डे बुजले नाहीत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आगळे वेगळे आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवरील खड्यात महाआरती करण्यात आली.
या आंदोलनामुळे तरी महापालिकेला सद्बुद्धी येईल आणि खड्डे बुजवले जातील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. रेतीबंदर विसर्जन घाटाच्या रस्त्यावरील खड्डे येत्या तीन दिवसांत बुजवले नाहीत तर उरलेला रस्त्ताही खोदून टाकू असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
COMMENTS