राणे भाजप प्रवेशाचे एक पाऊल पुढे, पण 27 ऑगस्टच्या मुहूर्ताबाबत संभ्रम कायम !

राणे भाजप प्रवेशाचे एक पाऊल पुढे, पण 27 ऑगस्टच्या मुहूर्ताबाबत संभ्रम कायम !

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत बातम्या वाचून वाचकही कंटाळले असतील. मात्र आता प्रवेशाला फार काळ वाट पहावी लागणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. तेंव्हा त्यांची राणे प्रवेशाबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येत्या 27 तारखेला मुंबईत येणार आहेत. सर्व चर्चा पूर्ण झाली तर राणे यांचा प्रवेश 27 तारखेलाच होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ही चर्चा पूर्ण झाली नाही तर मात्र प्रवेश काहीकाळ लांबण्याची शक्यता आहे. एक मात्र नक्की राणेंचा भाजप प्रवेश हा नक्की झाला आहे.

COMMENTS