ठाण्याच्या महापालिका उपायुक्तांना फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण !

ठाण्याच्या महापालिका उपायुक्तांना फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण !

ठाणे – ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली आहे. 100 ते 150 जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या अंगावरील कपडेही फाडून टाकले. नाकातोंडातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना माळवी यांच्यावर हा हल्ला झाला आहे.  या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी दोघांना घेतले आहे. माळवी यांना उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल  करण्यात आलं आहे.

COMMENTS