ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा झटका, बडा नेता 19 तारखेला शिवसेनेत करणार प्रवेश ?

ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा झटका, बडा नेता 19 तारखेला शिवसेनेत करणार प्रवेश ?

ठाणे –  ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे. पक्षाचा एक बडा नेता शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजेच 19 जुला शिवसेनेत प्रवेश करणार आहे.  मीरा भाईंदरचे माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा हे येत्या 19 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. गेली काही दिवस ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मेंडोसा हे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे समर्थक मानले जात होते. आर आर पाटील यांच्या निधनानंतर पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे. मीरा भाईंदर महापालिकेत मेंडोसा यांची मोठी ताकद आहे. मीरा भाईंदरचे सरपंच ते महापौर आणि आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलगी यांनीही मीरा भाईंदरचे महापौरपद भूषवले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक आहे. त्यापार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादीला मोठा झटका समजला जातोय.

COMMENTS