संजय दत्तला 8 महिने आधीच का सोडले ?  हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

संजय दत्तला 8 महिने आधीच का सोडले ?  हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

मुंबई – अभिनेता संजय दत्त याला शिक्षा पूर्ण होण्याच्या आधीच 8 महिने का  सोडले ? असा सवाल मुंबंई हायकोर्टानं राज्य सरकराला केला आहे. संजय दत्तला 8 महिने आधी सोडण्याच्या निर्णयाला पुण्यातील प्रदीप भालेकर यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर हायकोर्टाने हे सवाल उपस्थित केले आहेत. मुंबंई 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्यावेळी शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेदरम्यान तो बहुतेक वेळा पॅरोलवर बाहेर होता. मग तुरुंग प्रशासननाला एवढ्या कमी कालावधीत त्याची वर्तणूक चांगली होती हे कसे समजले ? असा सवालाही हायकोर्टाने केला आहे. केवळ येरवडा तरुंग प्रशासनाने राज्यपालांकडे संजय दत्तच्या चांगल्या वर्तणुकीच्या अहवालावर त्याची 8 महिने आधी सुटका केली का ?  या बाबत महाराष्ट्र कारागृह विभागाला विश्वासात घेतले होते का ? असे सवाल हायकोर्टाने राज्यसरकराला केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रक दाखल करुन द्यावेत असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. याप्रकरणी आता पुढच्या आठवड्यात हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

COMMENTS