मुंबई – बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसी आणि अन्य सरकारी यंत्रणांना नोटीस बजावली आहे.
मंगळवारी (दि.29) मुंबईतील अतिवृष्टीत बेपत्ता झालेले डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी समुद्राच्या किनाऱ्याजवळ सापडला होता. एल्फिन्स्टन परिसरात पाणी साचल्यामुळे अमरापूरकर कारमधून उतरले आणि चालत प्रभादेवीतील घराच्या दिशेने निघाले होते. यादरम्यान त्यांचा पाय उघड्या मॅनहोलमध्ये गेला आणि त्यात ते वाहून गेले होते.
मुंबई मंगळवारी अतिवृष्टीमुळे एलफिस्टन परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईतील व्यापारी संघटनेनी जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारविरोधात कारवाईची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टासमोर सुनावणी झाली. यात हायकोर्टाने महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना नोटीस बजावत दोन आठवड्यात याप्रकरणावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
COMMENTS