तब्बल 17 दिवसांनंतर मेधा पाटकर यांचे उपोषण मागे

तब्बल 17 दिवसांनंतर मेधा पाटकर यांचे उपोषण मागे

सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या उंचीविरोधात उपोषणाला बसलेल्‍या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी  आपले उपोषण मागे घेतले आहे. गेल्‍या 17 दिवसांपासून मेधा पाटकर उपोषणाला बसल्‍या होत्‍या. पाटकर यांनी रविवारी सकाळी सरबत पिऊन उपोषण मागे घेतल्‍याचे, धार जेलचे अधीक्षक सतीश कुमार उपाध्याय यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

नर्मदा खोर्‍यातील विस्थापितांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या मेधा पाटकर यांना 7 ऑगस्‍ट रोजी पोलिसांनी अटक केली होती. सरदार सरोवरावरील धरणाची उंची वाढवली तर नर्मदा नदीच्या परिसरातील सुमारे 192 गावांना फटका बसेल. जवळपास 40 हजार कुटुंब विस्थापित होण्याची भीती आहे. त्यामुळे या सगळ्यांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार मेधा पाटकरांनी व्यक्त केला होता.

 

COMMENTS