पंढरपूर : राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेने विरोध जरी केला असला तरी वेळ आल्यास उद्धवजींचे मन वळवू असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. तर कोविंद हे चळवळीतील नेते असून त्यांच्या उमेदवारीमुळे दलितांचा सन्मान केला गेला आहे. घटना बदलण्याचा प्रश्नच येत नसून पंतप्रधान मोदी यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर मध्ये बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले पंढरपूर येथे एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नाला आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी त्यांच्या 3 वर्षाच्या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. गोर-गरीब,दलिताना न्याय दिला असे आठवले यांनी सांगितले. राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करून एक क्रांतिकारक निर्णय घेतल्याचे आठवले यांनी सांगितले.काही जण घटना बदलली जाईल असे म्हणत आहेत. मात्र त्यांच्या निवडीनंतर घटना बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याचे आठवले यांनी सांगितले.
कोविंद यांच्या उमेदवारी बाबत शिवसेनेनी विरोध केला आहे?असे विचारले असता आठवले म्हणाले कि,बाळासाहेब ठाकरे यांचा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र करण्याचा प्रस्ताव होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.उद्धवजीचा दलितांना विरोध नाही.आणि जर वेळ पडली तर उद्धवजी यांचे मन वळवू असे आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, मध्यावदि निवडणुका होणार नाहीत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय घेवून मास्टर स्ट्रोक लावला असल्याचे ते म्हणाले. यावेळी आरपीआयचे राजा सरवदे,जितेंद्र बनसोडे चंद्रकांत वाघमारे,दीपक चंदनशिवे आदी कार्यकते उपस्थित होते.
COMMENTS