…तर कोणालाही सोडणार नाही –  योगी आदित्यनाथ

…तर कोणालाही सोडणार नाही – योगी आदित्यनाथ

पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचाराची तक्रार मिळाल्यास कोणालाही सोडणार नाही, असा इशाराच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन भाजपकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यानंतर योगींनी हा इशारा दिला.

गोरखपूर विश्वविद्यालय परिसरात आयोजित एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 30 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यानंतर ते म्हणाले, या योजनेंतर्गत राज्यातील 10 लाख ग्रामीण क्षेत्र आणि दोन लाख शहरी परिसरातील गरिबांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या योजनेत जर भ्रष्टाचार किंवा कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचे निर्देशनास आले तर कोणालाही सोडणार नाही, असा इशाराच योगींनी यावेळी दिला.

 

COMMENTS