…….तर कोपर्डीतील उद्याचा कार्यक्रम उधळून लावू – संभाजी ब्रिगेड

…….तर कोपर्डीतील उद्याचा कार्यक्रम उधळून लावू – संभाजी ब्रिगेड

पुणे –  भय्यू महारांनी कोपर्डीत अत्याचार झालेल्या मुलीच्या स्मनार्थ स्मारक बांधले आहे. उद्या त्यासंदर्भातला कार्यक्रम कोपर्डीत आयोजित करण्यात आला आहे. मात्र या स्मारकाला आणि उद्याच्या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड विरोध केला आहे. पीडीत मुलीचे स्मारक अपमानाचे, अत्याचाराचे प्रतिक ठरेल आणि त्यातून पीडीत मुलीची बदनामी होईल असं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने स्मारकाला आणि उद्याच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. उद्याचा कार्यक्रम रद्द करावा आणि तिथले स्मारकही हटवावे अन्यथा उद्याचा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे.

COMMENTS