मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जनतेची फसवणूक करत असून त्यांनी काँग्रेसने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. जर सरकारने या शेतकऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर काँग्रेस वेळ आल्यास सरकार विरोधात न्यायालयात लढा उभारला जाईल. असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
सचिन सावंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात कर्ज लाभार्थ्यांना तीन वर्षाचा अधिक काळ घोषित केला आहे. जर 2012 ऐवजी 2009 पासून मुख्यमंत्री कर्जमाफी देत आहेत. तर मग 34 हजार कोटींची कर्जमाफीची रक्कम का वाढली नाही ? मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलणे टाळले आहे. यावरुन मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आकडेवारी खोटी असल्याच स्पष्ट होत आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत माध्यम शेती पूरक कर्जाचा समावेश असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री वारंवार पीक कर्जाचा उल्लेख करून शेती पूरक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री डावलत आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शेतकरीं अर्बन बँक, पतसंस्था, मायक्रो फायनान्स तसेच सावकाराकडून कर्ज घेतात त्या शेतकऱ्यांबाबत सरकारने काय भूमिका घेतली आहे ? असा सवाल करत सावंत यांनी इशारा दिला आहे कि, जर सरकारने या शेतकऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल तसेच वेळ आल्यास सरकार विरोधात न्यायालयात लढा उभारला जाईल.
COMMENTS