उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, रामाचा आदर्श मानणाऱ्या सरकारनं वचन पाळावे – राजू शेट्टी

उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, रामाचा आदर्श मानणाऱ्या सरकारनं वचन पाळावे – राजू शेट्टी

नाशिक – शेतकरी प्रश्‍नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून सुकाणू समितीच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रेला आज नाशिकपासुन सुरूवात झाली .

सरकारने किती रक्कम खर्च टाकली हे आधी जाहीर करावे. खर्च सात -आठ हजार कोटी पेक्षा अधिक नसेल. 34 हजार कोटी कर्जमाफीचा आकडा खोटा ढोल वाजविणे बंद करा. उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. रामाचा आदर्श मानणाऱ्या सरकारनं वचन पाळावे. असे खडेबोल खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला सुनावले.

कर्जमाफीच्या अपयशी निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यावेळी मेळाव्यात समृद्धी भूसंपादन रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

COMMENTS